आमचे उपक्रम

            Click

माझी शाळा - माझे उपक्रम

अभिव्यक्ती हंडी

सौ.ज्योती दिपक बेलवले .
जि.प.शाळा केवणीदिवे .
ता.भिवंडी ..जि.ठाणे.

साहित्य - हंडी , चिठ्ठ्या, काठी इ.

कृती - गोपाळकालानिमित्त वर्गातील मुलामुलींचे मानवी मनोरे याचे प्रात्यक्षिके घेतली. मुलांनी त्यांच्या कल्पकतेने नवीन मनोरे तयार केले.गवळणींचे गायन केले.

घरात लग्नाला पुजतात त्यातील एक टाकाऊ  छोटे मडके घेतले.त्या हंडीत चिठ्ठ्या टाकल्या.प्रत्येक चिठ्ठीवर एक कृती लिहिली .जसे...गोष्ट सांग, कविता म्हण, आवडत्या पक्ष्याचे वर्णन कर, गवतफुलाचे वर्णन ,विनोद सांग, गाणे म्हण,नृत्य कर इ.कृती लिहिल्या. हंडी वर बांधली.उंचीप्रमाणे मुलांना उभे करुन  एक काठी देऊन उडी मारुन हंडी फोडण्यास सांगितले .हंडी फुटल्यावर त्यातील खाली पडलेल्या चिठ्ठ्यांपैकी प्रत्येकाला एक चिठ्ठी उचलण्यास सांगून प्रत्येक मुलाला पुढे येऊन मोठ्याने चिठ्ठी वाचण्यास सांगून त्यावर लिहिलेली कृती करण्यास सांगितले .
 यामुळे मुलांचा शारीरिक विकास होऊन धाडसीवृत्ती वाढते.सभाधिटपणा वाढून मुले अभिव्यक्त होतात म्हणून ही हंडी म्हणजे अभिव्यक्ती हंडी होय.





आजचा उपक्रम
पाखरांच्या शाळेसंगे माझा वाढदिवस.
सौ.ज्योती दिपक बेलवले.
जि.प.शाळा केवणीदिवे.
ता.भिवंडी..जि.ठाणे.

साहित्य - जुने पुठ्ठ्याचे बाँक्स,घोटीव कागद, फेविकाँल,स्केचपेन इ.

कृती - शाळेतील पूरक आहारातंर्गत बिस्किटांचे रिकामे पुठ्ठ्याचे बाँक्स होते. त्या टाकाऊ बाँक्सचे पुठ्ठे वेगवेगळे करुन त्यांचे पक्ष्यांचे आकार कापले.माझा पट ४८ असल्याने ४८ पक्षी बनवले.त्या पक्ष्यांच्या आकारावर रंगीबेरंगी घोटीव कागद लावले.प्रत्येक पक्ष्यावर एक एक मुलाचे नाव आणि जन्मदिनांक लिहिली . वर्गाला दोन दरवाजे असल्याने एक दरवाजा नेहमीच बंद असतो.त्या दरवाज्यावर पक्षी तारेवर बसल्याप्रमाणे चिटकवले.कोलाजकामांतर्गत ढग आणि झाड काढून त्यास वेगळेपण दिले.

प्रत्येक मुलाचे नाव आणि जन्मदिवस लिहिल्याने मुले खूप खूष झाली.एकमेकांना जन्मदिवस पाहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागले.टाकाऊतून नवनिर्मिती करण्याची दिशा मिळाली.कलात्मकतेचा आणि सृजनशिलतेचा विकास झाला.










              माझ्या वर्गातील  वर्ग मंत्रिमंडळ ..





                             वर्गाचे अभ्यासगट..







इ.६ वी  नवीन अभ्यासक्रम ..
इंग्रजी विषयावर तयार केलेले साहित्य  आहे.हे तयार करण्यास मला रिया(माझी लेक)जी आता सहावीलाच गेलीय तिने मदत केली..
साहित्य तयार करताना पाठ्यपुस्तकाचा विचार करुन नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे.टाकाऊतून साहित्य निर्मिती केलीय. जुन्या पत्रावळीपासुन फुले तयार केलीत.पाठ्यपुस्तकाबाहेरील परंतु घटकासंबंधी माहिती आहे.ती शोधण्यास रियाची मदत खूपच झाली.तिने देखील हे सर्व आवडीने केलय..म्हणजेच माझी मुले देखील शाळेत इंग्रजी आवडीनेच शिकतील..
















 here





🕷🐊🐘🐄🌳🌺🍃🌙🌞🐿

उपक्रमाचे नाव
मी नाम (नामांचे प्रकार)
भाग..१
इ.६वी मराठी नवीन अभ्यासक्रम

या उपक्रमासाठी काही निवडक चित्रे घेतली.या चित्रांचे रेखाटन व रंगकाम मुलांमार्फत करुन घ्यावे..सुट्टी असल्याने हे सर्व माझी बछड़ी रियाने केलय.

ही सर्व चित्रे एका ठराविक आकाराच्या कार्ड वर काढली.ही कार्डे बसतील अशी एक चौकट तयार केली..हे साहित्य तयार करण्यासाठी एक आकर्षक लग्नपत्रिकेचा वापर केलाय.एक एक चित्र चौकटीत टाकून त्याचे सामान्य नाम, विशेष नाम व भाववाचक नाम सांगण्यास सांगितले ...

उदा.

🐕
 सामान्य नाम..कुत्रा
विशेष नाम..मोती
भाववाचक नाम...चातुर्य

🐕
सामान्य नाम..कुत्री
विशेष नाम..चंपा
भाववाचक नाम..चपळता

याप्रकारे मुलांना जसे सुचेल तसे नामांचे नमुने घेऊन विविधता आणता येईल..वेगवेगळ्या चित्रांच्या साह्याने अधिक सराव घेता येईल..

या उपक्रमामुळे मुले विचार करुन नामांचे प्रकार सांगतील.कृतियुक्त सहभाग घेतील.खेळाद्वारे आनंदी वातावरणात नामांचे प्रकार शिकतील..

       ✍ निर्मिती व लेखन ✍
   *सौ.ज्योती दिपक बेलवले*

      जि. प. शाळा केवणीदिवे.
               ता.भिवंडी
                जि.ठाणे.

🔹 *कृतिशिल शिक्षक महाराष्ट्र* 🔹
              *(ATM)*
🐢🕷🐊🐘🐄🌳🌺🍃🌙🌞🐿🌧🌧🌧🌧🌧🌧🌧🌧












आज जि प शाळा केवणीदिवे येथे जलजागृती सप्ताह अभियाना अंतर्गत सकाळी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या  संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सरपंच व पदाधिकारी , शा.व्य. समिती , माता पालक संघ , पालक शिक्षक संघ या सर्वांच्या उपस्थितीत प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली.

प्रभातफेरीसाठी मुलांनी बरेचसे स्वलिखीत घोषवाक्ये तयार केली.काही मुलांनी संग्रही घोषवाक्यांचा देखील उपयोग केला.

यावेळी पाणी हे किती महत्वाचे असून त्याचा वापर किती जपून केला पाहिजे तसेच सध्या महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ आहे त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे .व पाण्याचे महत्व या विषयावर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले

शाळेत 'पाणी 'या विषयावर विविध कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये..

निबंधस्पर्धा
चित्रकला स्पर्धा
वत्कृत्व स्पर्धा

घेण्यात आल्या.

विविध उद्बोधन पर गीते,कविता,गाणी व भारुड म्हटले.परिपाठात गीताचे गायन घेतले.

होळी,धुलीवंदन व रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय करणार नाही असा संकल्प करुन आजूबाजूच्या घरात देखील पाण्याचे महत्व समजावून सांगण्याचे ठरले.

एकंदर सकारात्मक दृष्टीने
"पाणी बचत..पाणी संवर्धन"
 या विषयांवर  मुलांनी आपले विचार करुन दाखवले.

चला तर मग पाण्याचे महत्व समजून घेऊया व इतरांना ही सांगूया.

    "पाणी म्हणजेच जीवन"
💧💧💧💧💧💧💧
🌧🌧🌧🌧🌧🌧🌧
कृतिशील शिक्षक महाराष्ट्र
       (ATM )
ज्योती दिपक बेलवले
जि. प.शाळा केवणीदिवे
भिवंडी ठाणे

Comments

Popular posts from this blog

शिकू आनंदे मराठी, कृतिपुस्तिका मार्गदर्शक व्हिडिओ

निपुण भारत अभियान प्रतिज्ञा

दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह