Posts

Showing posts from October, 2016

मैत्री अक्षरलेखन कलेशी

Image
मैत्री अक्षरलेखन कलेशी मैत्री अक्षरलेखन कलेशी. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 एक चित्रकलेची मोठी वही आणली.ती रोज मधल्या सुट्टी टेबलावर ठेवत असे.डबा खाऊन झाल्यावर वर्गातील कुणीही ज्यांना  आवड नव्हे तर इच्छा असेल त्यांनी कोणत्याही प्रकारचे फक्त अक्षरलेखनच करावे अशी सुचना दिली.अक्षरलेखन कसे करावे...त्यातील बारकावे उदाहरण देऊन व चित्रांचे नमुने दाखवून स्पष्ट केले . मुले अक्षरलेखन नमुने शोधण्यासाठी वर्तमानपत्र ..दुकानांच्या पाट्या...माझ्या मोबाईलची गँलरी...इतर पुस्तके इ. चे निरीक्षण करुन अक्षरलेखन करू लागली.आठवड्यारातच मुले  स्वतःची कल्पकता वापरुन अक्षरलेखन करु लागली. त्यातील काही नमुने ... आता प्रत्येक जण आवडीने अक्षर लेखन करत आहे यामुळे लेखनाची आवड निर्माण झाली. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 ज्योती दिपक बेलवले .

नाविन्यपूर्ण कवितालेखन

Image
नाविन्यपूर्ण कवितालेखन इयत्ता ..आठवी विषय..इंग्रजी उपक्रम कृती Acrostic Acrostic म्हणजे अशी कविता किंवा लिखाण ज्याची सुरुवातीची अक्षरे घेऊन लिखाण करायचे. उदा.Moon Moving and shining across the sky. On the land it shines. On the sea it sparkles Night after night. अशाच तर्हेने माझ्या मुलांनी मराठी , हिंदी व इंग्रजी या तिन्ही विषयांचे केलेले स्वलेखन नमुने. लेखन कसे करावे...शब्द कसा निवडावा...वर्णाक्षरांवरुन लेखन कसे करावे याबाबत विविध प्रकाराचे नमुना लेखन करुन स्पष्ट केले.नमुना लेखन करताना देखील मुलांकडूनच शब्द घेऊन...त्यांची मदत घेऊन ..कशी रचना करावी हे स्पष्ट केले . काही नमुने...मुलांच्या स्वलेखनाचे. कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ATM ज्योती दिपक बेलवले . जि.प.शाळा केवणीदिवे . ता.भिवंडी ..जि..ठाणे.

गणिती कँरम

Image
गणिती कँरम आजचा उपक्रम ...गणिती कँरम इ. ५वी ते ८ वी साठी शाळेत कँरमबोर्ड नव्हता.मुलांना विचारले कुणाच्या घरी कँरम आहे.वर्गातील विपूल म्हणाला ...मँडम माझ्या घरी कँरम आहे पण आम्ही खेळत नाही .त्याच्याकडून वडिलांचा फोन नंबर घेऊन संपर्क साधला व गणित उपक्रमासाठी कँरम वर्गासाठी द्या...आशी विनंती केली.विपूलचे वडील देवानंद पाटील यांनी आनंदाने वर्गासाठी कँरम दिला. साहित्य- कँरमबोर्ड..संख्याकार्ड कृती -कँरमच्या सोंगट्यांवर धन व ऋण पुर्णाक संख्या लिहिल्या. स्ट्रायगर वर बेरीज..वजाबाकी ..गुणाकाराचे चिन्ह काढले. चार मुलांना खेळायला सांगितले .स्ट्रायगरचा स्पर्श ज्या सोंगटीला होईल ती सोंगटी बाजूला काढायची.पुन्हा त्याच मुलाला स्ट्रायगर मारायला सांगून आता ज्या सोंगटीला स्पर्श होईल ...त्या सोंगटीसमोर स्ट्रायगरचे जे चिन्ह असेल (+ -*) ती क्रिया आधी काढलेली सोंगटी व दुसऱ्या वेळेस काढलेल्या सोंगटीची करायला सांगायची.त्याने बरोबर उत्तर दिले तर दोन्ही सोंगट्या त्याला द्यायच्या...चुकीचे उत्तर दिले तर सोंगट्या आत ठेवायच्या...आणी पुढच्या मुलाला संधी द्यायची. शेवटी सर्व सोंगट्या काढून झाल्यावर...प्रत्येका...